
कुंभवडेत उद्यापासून हरिनाम सप्ताह..
वैभववाडी: दरवर्षीप्रमाणे कुंभवडे येथील श्री कुंभजाई मंदिरात उद्यापासून हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे. या सप्ताहानिमित्त राज्यातील नामवंत कीर्तनकार यांच्या माध्यमातून कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. पुढील आठ दिवस येथील मंदिरात हरिनामाचा जागर होणार आहे.
आदिनाथ वारकरी संप्रदाय मंडळ कुंभवडे यांच्या वतीने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी उद्या २६ जानेवारीपासून हा सप्ताह सुरू होत आहे.सप्ताहाच्या पहिल्या दिवशी दिनांक २६ जानेवारी रोजी कोळंब येथील ह भ प दौलत पाटेकर यांच किर्तन होणार आहे.दि २७ जानेवारी रोजी ह.भ.प विनोद महाराज पाटील मुंबई, २८ जानेवारीला ह.भ.प. राम महाराज कोगेकर (कोल्हापूर) २९ जानेवारी ह.भ.प बाबुलाल बोरसे भागवताचार्य( पंढरपूर) ३० जानेवारी रोजी ह.भ.प. बाबुराव वाघ (पंढरपूर) ३१ जानेवारी रोजी ह.भ.प. गाभामुर्ती काटे (अहमदनगर) ,१ फेब्रुवारी रोजी ह भ प संतोष महाराज राठोड (मुंबई) २ फेब्रुवारी रोजी काल्याचे किर्तन ह भ प नारायण महाराज जाधव हे करणार आहेत. त्याचबरोबर बुधवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ३ ते ५ या वेळेत कुंभवडे ग्रामस्थ संघ यांच्या वतीने महिलांकरिता हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तालुक्यातील सर्व भक्तांनी या हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन आदिनाथ वारकरी संप्रदाय मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.