सावंतवाडी विठ्ठल मंदिरात उद्यापासून हरिनाम सप्ताह...!

Edited by: विनायक गावस
Published on: June 19, 2023 12:56 PM
views 143  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात २० ते २६ जून या कालावधीत हरिनाम विणा सप्ताह साजरा होणार आहे. या निमित्त २० ते २६ जून या कालावधीत रोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत महिला मंडळांचे भजनांचे कार्यक्रम, तर सायंकाळी ६ ते रात्री १० वा. वेळेत भजन व भक्तीगीतांचे कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार २७ जून रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच दुपारी महाप्रसाद, गुरुवार २९ जून रोजी देवशयनी आषाढी एकादशी उत्सव होणार आहे. सायंकाळी ६ वाजता कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.