सावंतवाडी विठ्ठल मंदिरात हरिनाम सप्ताहास प्रारंभ !

Edited by: विनायक गावस
Published on: June 20, 2023 19:16 PM
views 148  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात हरिनाम विणा सप्ताहास प्रारंभ झाला आहे. २० ते २६ जून या कालावधीत हरिनाम वीणा सप्ताह साजरा होणार आहे.

या निमित्त २० ते २६ जून या कालावधीत रोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत महिला मंडळांचे भजनांचे कार्यक्रम, तर सायंकाळी ६ ते रात्री १० वा. वेळेत भजन व भक्तीगीतांचे कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार २७ जून रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच दुपारी महाप्रसाद, गुरुवार २९ जून रोजी देवशयनी आषाढी एकादशी उत्सव होणार आहे. सायंकाळी ६ वाजता कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.