कलमठमध्ये विठ्ठल रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताहाचं आयोजन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 03, 2025 11:32 AM
views 88  views

कणकवली : कलमठ-बाजारपेठ येथील श्री. विठ्ठल रखुमाई मंदिरातील हरिनाम सप्ताहानिमित्त मंगळवार ५ ते बुधवार ६ ऑगस्ट या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार ५ रोजी सकाळी ११ वा. घटनस्थापना, त्यानंतर प्रथेप्रमाणे अहोरात्र गावातील प्रत्येक वाडीतील भजनाची वारी (पार) पडणार आहे. बुधवार ६ रोजी सकाळी १० वा. पालखीची नगर प्रदक्षिणा होईल.त्यानंतर दुपारी १ वा. महाप्रसाद आहे. सर्वांनी हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केले आहे.