हरे कृष्ण संस्कार केंद्र, सावंतवाडीच्या रामकथेला प्रारंभ

Edited by: विनायक गावस
Published on: April 15, 2024 13:53 PM
views 54  views

सावंतवाडी : हरे कृष्ण संस्कार केंद्र, सावंतवाडी येथे तीन दिवसीय रामकथेला प्रारंभ झाला. 

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडीच्या वतीने आयोजित केलेल्या रामकथेचा प्रारंभ सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.

संस्थेच्यावतीने प्रत्येक वर्षी रामकथेच आयोजन करण्यात येत. यावर्षी लोकनाथ स्वामी महाराज यांचे शिष्य श्रीमान कृष्ण नाम प्रभुजी रामकथा करण्यासाठी लाभले आहे. स्वता कृष्ण नाम प्रभुजी उच्च शिक्षित आहेत. त्याच बरोबर त्यांनी आध्यात्मिक शास्त्रात भक्तीशास्त्री ही पदवी मिळवली आहे. रामायणातील बंधु प्रेम (भरत मीलन)या विषयावर रामकथा रामनवमी पर्यंत चालू राहील. रोज भजन, कीर्तन, प्रवचन, आरती, महाप्रसाद, असा भक्तीमय वातावरणात सोहळा साजरा केला जात आहे.