मोदी @9 ; 'हर घर संपर्क'अभियानाचा कणकवली मतदारसंघात दमदार शुभारंभ

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 20, 2023 20:03 PM
views 126  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील लोरे नं.१ येथे मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती,सिंधुदुर्ग, तुळशीदास रावराणे, कणकवली विधानसभा संयोजक मनोज रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोदी सरकारच्या नऊ वर्षातील गौरवशाली कामगिरीचा लेखाजोखा असलेल्या पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रत्येक बुथवरील बूथ समितीच्या सदस्यांनी बुथमधील घरे विभागून घेऊन त्या त्या घरात जात नागरिकांशी संपर्क करावा.आणि 9090902024 या नंबरद्वारे मोदीं सरकारच्या कामगिरीसाठी समर्थन द्यावे असे आवाहन करावे,असे या अभियानाचे स्वरूप आहे. 

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन चीके,भाजपा तालुका अध्यक्ष श्री.संतोष कानडे,दिलीप तळेकर,रवी पाळेकर,प्रकाश पारकर, पंढरीनाथ वायंगणकर, दामोदर नारकर,लोरे सरपंच अजय रावराणे, घोणसरी सरपंच मॅक्सी पिंटो, कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर,लोरे उपसरपंच सुमन गुरव, शक्तिकेंद्रप्रमुख विश्वनाथ जाधव,सुनील लाड व भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते,बूथ समिती सदस्य उपस्थित होते.