संकेत लब्दे यांच्या मुहूर्ताच्या आंबा पेट्या वाशी मार्केटला रवाना

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 30, 2024 08:29 AM
views 1057  views

देवगड :  देवगड  येथील प्रतिथयश आंबा बागायतदार संकेत लब्दे यांच्या मुहूर्ताच्या पहिल्या देवगड हापूस आंबा पेट्या नवी मुंबई वाशी मार्केट येथे पाठविण्यात आल्या. हापुस आंब्याच्या ह्या त्यांच्या पहिल्या पेट्या मुंबईला रवाना झाल्या. देवगड कुणकेश्वर-कातवणेश्वर येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी संकेत लब्दे  यांची यावर्षीची हि पहिल्या सहा डझन हापुस आंब्याच्या पेट्या मुंबई येथील वाशी मार्केटला रवाना झाल्या. 

हापुस आंब्याला जागतिक स्तरावर पोहचविणारे संकेत लब्दे जानेवारी च्या मुहूर्तावर हापुस आंब्याच्या पहिल्या पेट्या मुंबईला पाठविल्या आहेत. ते सप्टेंबर ते ऑक्टोंबर नोव्हेंबर काळात त्यांच्या आंबा कलम बागेत मोहर आला होता. हा मोहोर त्यांनी मेहनत करून हा मोहोर वाचवला. या काळात पाऊस होऊन सुध्दा झाडाला आलेला आंबा मोहोर वाचवला. त्यांच्या आंबा बागेत अजून पेट्या आंबा असून पुढील आठवड्यातच हा आंबा मुंबई वाशी मार्केट येथे पाठवण्यात येणार आहे. २०१९ नंतर ४ वर्षाच्या गॅप नंतर हा आंबा जानेवारी महिन्यात मार्केट मध्ये आपण पाठवतो आहे असे त्यांनी सांगितले. बदलत्या हवामाना चा फटका देवगड हापूसला मोठ्या प्रमाणावरती बसतो आहे. पण त्यातून शेतकऱ्यांनी निराश न होता खचून न जाता संकट हे एक नवीन संधी घेऊन येत असत त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन करून आंबा कश्या प्रकारे चांगल्या प्रतीचा मार्केट मध्ये पाठवता येईल याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत आंबा बागायतदार संकेत लब्दे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.