अर्चना घारे-परबांकडून व्यापारी वर्गाला दीपावलीच्या शुभेच्छा

Edited by: विनायक गांवस
Published on: November 03, 2024 12:53 PM
views 294  views

सावंतवाडी : दिपावलीच्या चौथ्या दिवशी लक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यानिमित्ताने शहरातील बाजारपेठ अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी व्यापारी वर्गाला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. कुबेर लक्ष्मीचे आशीर्वाद त्यांनी घेतले. दीपावली सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी घेऊन येवो व कुबेर लक्ष्मीचा कृपाशीर्वाद सदैव राहो अशा शुभेच्छा सौ. घारेंनी यावेळी दिल्या. बाजारपेठेतील व्यापा-यांनी आपल्या दुकान, कार्यालयात तसेच उद्योगक्षेत्रात कुबेर लक्ष्मी पूजन केले‌. यावेळी प्रसाद म्हणून बताशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, पुजा दळवी, देवयानी टेमकर, अॅड.सिद्धी परब, हिदायतुल्ला खान, ऋतिक परब आदी उपस्थित होते.