हनुमान युवक क्रीडा मंडळ, देवगडच्यावतीने क्रीडा स्पर्धा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 21, 2025 18:49 PM
views 65  views

देवगड : हनुमान युवक क्रीडा मंडळ, देवगड यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

२६ रोजी दुपारी ३ वा. येथील शेठ म. ग. हायस्कूल येथे खुल्या गटात शुटींग हॉलिबॉल स्पर्धा होणार आहेत. यातील प्रथम व द्वितीय क्रमांकांना अनुक्रमे ८ हजार रू. व चषक व ६ हजार रू. व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तृतीय व चतुर्थ क्रमांकांना प्रत्येकी २ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे. वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छीणाऱ्या स्पर्धकांन हॉलिबॉल स्पर्धेसाठी २४ जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे. वैयक्तिक स्पर्धांचे बक्षीस वितरण २६ रोजी सायंकाळी ६ वा. शेठ म. ग. हायस्कूल येथे होणार आहे.

स्पर्धांसाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी दोस्ताना सायकल मार्ट (९४२२५८४६६५) व विनय प्रिंटर्स (९८६०९२६५६७) येथे संपर्क साधावा, असे आवाहन हनुमान युवक क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.