वर्देत हनुमान जन्मोत्सवाचा उत्साहात !

Edited by: ब्युरो
Published on: April 24, 2024 07:58 AM
views 137  views

कुडाळ : कुडाळ वर्दे येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 

जन्मोत्सवानिमित्त १२ पारांचा हरिनाम सप्ताह पार पडला. यावेळी सकाळी घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर वाडीतील ग्रामस्थांची भजने व आरत्या असे कार्यक्रम झाले. त्यानंतर रात्री ठीक 8 वाजता जिल्हास्तरीय महिला बुवांच्या भजन स्पर्धा पार पडल्या. यात 8 आमंत्रित बुवांनी भाग घेतला होता. नरसिंह संगीत महिला भजन मंडळ आवळेगाव बुवा साक्षी मेस्त्री हिने प्रथम क्रमांक संपादित केला. ह्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. दुपारी ठीक 1वाजता महाप्रसादचा लाभ ग्रामस्थ भाविक यांनी घेतला.