पांग्रडमधील तरुणाने जीवन संपवलं !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 03, 2024 19:58 PM
views 624  views

कुडाळ  : कुडाळ तालुक्यातील पांग्रड काजीमाचे टेंब येथील गणेश राजाराम मर्गज  (वय33 वर्ष) याने आपल्या राहत्या घरातील खोलीतील आडव्या लाकडी बाराला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याची माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

याबाबतची खबर राजाराम मर्गज यांनी कुडाळ पोलिसांना दिली 2 जानेवारी रात्री 10 ते 3 जानेवारी सकाळी आठचे पूर्वी ही घटना घडल्याचे खबरीत म्हटले आहे याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव करीत असून घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक कराडकर यांनी भेट दिली