आदर्श शाळा देवगड येथे हस्ताक्षर सुधारणा कार्यशाळा !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 05, 2023 10:29 AM
views 459  views

देवगड : देवगड येथील आदर्श शाळा येथे पालक व शिक्षकांसाठी हस्ताक्षर सुधारणा कार्यशाळा संपन्न झाली .भारतातील पहिली डॉक्टरेट मिळवणारे डॉ.भाई बांदकर यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले.

अक्षरयात्रेच्या या कार्यक्रमाचा 6785 वा कार्यक्रम देवगड सडा शाळेसह देवगड केंद्रातील शाळा तारामुंबरी , देवगड किल्ला देवगड नंबर १ आधी शाळा मधून सहभागी झालेल्या बहुसंख्य पालक विद्यार्थी शिक्षक यांच्या उपस्थितीत पार पडला.हस्ताक्षर सुधारणा विषयात भारतातील पहिली डॉक्टरेट मिळवणारे डॉ.भाई बांदकर यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले. डॉ.भाई बांदकर हे यशदा पुणे चे माहिती अधिकार विषयाचे महाराष्ट्राचे प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. शैक्षणिक विषयात उपक्रम करणाऱ्या बी पॉझिटिव्ह संस्थेचे ते संचालक आहेत. महाराष्ट्रभर पालकांना हस्ताक्षर सुधारणा विषयात प्रशिक्षित करण्याचा ते कार्यक्रम घेतात असे त्यांनी हजारो कार्यक्रम घेतले आहेत. मूळचे देवगड कट्टा येथील असलेले डॉ बांदकर यांच्या खुमासदार शैलीतील पार पडलेल्या या कार्यशाळेत उपस्थितीतांना अवघ्या चाळीस मिनिटात सुंदर हस्ताक्षर कसे काढावे हे प्रात्यक्षिकासह अनुभवता आले.

अक्षर लेखनातील मर्म सांगताना त्यांनी स्मरणाचे महत्व विशद केले त्याचबरोबर अक्षर लेखनाचा योग्य मार्ग  सांगितला. त्याचबरोबर ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे हेही पालकांना सांगितले. विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी स्वतः पालकांनी लिहिते होणे फार गरजेचे आणि महत्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

       उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखन कौशल्याचा गुरू मंत्र दिला.त्यांनी पेन कसा धरावा याचे शास्त्र शुद्ध मार्गदर्शन केले. योग्य पद्धतीने लेखणी धरल्यास कमी वेळेत भरपूर लेखन करता येते हे प्रयोगाने दाखवून दिले.डॉ बांदकर यांच्या मार्गदर्शनाचा पालकांसह विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक आयुष्यात फार मोठा फायदा होऊ शकतो , असे सचिन जाधव  सर यांनी माहिती देताना सांगितले. या मार्गदर्शन वर्गाबद्दल उपस्थित पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सुनिता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट, मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज देवगडचा हा उपक्रम तालुक्यातील विविध शाळांमध्ये निशुल्क आयोजित करण्यात येत आहे.या बद्दल  शाळेने कृतज्ञता व्यक्त केली आहे. गट समन्वयक श्री अशोक जाधव ,केंद्रप्रमुख स्नेहा पारकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कावले शाळेचे शिक्षक श्री आनंद जाधव ,तारामुंबरी शाळेचे शिक्षक श्री संदीप परब, देवगड किल्ला शाळेचे शिक्षक श्री विकास जांभवडेकर, देवगड नंबर १  शाळेच्या शिक्षिका प्राची चव्हाण , यांच्या यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.तर देवगड पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी श्री.  संतोष बिर्जे यांनी ध्वनी व्यवस्था उपलब्ध करून दिली होती.

     या कार्यक्रमासाठी देवगड सडा शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांनी विशेष प्रयत्न केले.