हळबे महाविद्यालयाच्या प्रा. प्रज्ञाकुमार गाथाडे यांना मुंबई विद्यापीठाचा बेस्ट टीचर एवार्ड

Edited by: संदीप देसाई
Published on: September 05, 2023 17:14 PM
views 72  views

दोडामार्ग : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. प्रल्हाद ज्ञानोबा गाथाडे यांना मुंबई विद्यापीठातर्फे सन 2022 23 चा आदर्श शिक्षक पुरस्कार मंगळवारी शिक्षक दिनी मुंबई सांताक्रूझ येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांचे समवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत उपस्थित होते. प्रा. गाथाडे हे एक उपक्रमशील शिक्षक असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 प्रा. प्रज्ञाकुमार गाथाडे मूळ लातूरचे असून ते गेली 18वर्षे हून अधिक काळ दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई हळबे विद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अध्यापना बरोबरच तालुक्यांतील भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा अभ्यासासाठी योगदान दिलं आहे. साहित्य लेखन, कथा लेखन तसेच विविध वृत्त पत्रातून त्यांनी येथील विविध विषयांवर लेखन केलं आहे. 

     विशेष म्हणजे आतापर्यंत त्यांनी तीन मायनर रिसर्च पूर्ण केले असून दोन प्रोजेक्टला मुंबई विद्यापीठाने तर एका प्रोजेक्टला ICSSR मुंबई या अनुदान मंजूर केले होते. आतापर्यंत एकूण 48 सेमिनार व 42 वर्कशॉपला ते उपस्थित राहिले असून

राज्यस्तरीय सेमिनार कॉन्फरन्समध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. लेखनाची आवड असल्याने आतापर्यंत 10 पुस्तकांची त्यांनी लिखाण केले असून, त्यातील गावठाण या पुस्तकाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    भूगोल विभागामार्फत त्यांनी आतापर्यंत 5 MOU केले असून गोव्यातील एक पर्यावरण संस्था व एक कॉलेज तर महाराष्ट्रातील 3 कॉलेज बरोबर MOU करून काही उपक्रम राबविले जात आहेत. यापूर्वीही त्यांना मुंबई विद्यापीठ 2012-13 चा बेस्ट प्रोग्राम ऑफिसर पुरस्कार, कोल्हापूर येथील संत रोहिदास रत्न पुरस्कार, महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे, आरती मासिक पुरस्कार सावंतवाडी 2018-2021,  अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार लातूर २०२२-२३, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य एकादमी पुरस्कार लातूर -२०२२-२३ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र आता थेट त्यांना मुंबई विद्यापीठाने बेस्ट टीचर अवॉर्ड  देऊन सन्मानित केल्याने त्यांनी गेल्या पंधरा वीस वर्षात अध्यापन बरोबरच सामाजिक चळवळीत विवध क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा चीज झालं आहे.