हडी ज्येष्ठ नागरिक संघाकडून 70 गुणवंतांचा गौरव

Edited by:
Published on: August 16, 2025 12:59 PM
views 49  views

मालवण : ज्येष्ठांचे आशीर्वाद बाजारात विकत मिळत नाहीत. त्यामुळे आजचे होणारे तुमचे कौतुक म्हणजे आशीर्वाद आहेत. नेहमी सद्गुण अंगीकारा. अभ्यासात यश मिळवताना  चांगले नागरिक सुद्धा बना. जेष्ठ नागरिक संघाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक आहे. मुलांनी स्वतः बरोबरच गावाचे नाव रोशन करावे असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापिका सौ.श्रुती गोगटे यांनी केले.                   

 फेस्कॉन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने गावातील 70 गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव कार्यक्रम हडी जठारवाडी शाळा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रकाश तोंडवळकर, माजी सभापती उदय परब, हडी ग्रामस्थ मंडळ मुंबईचे कोषाध्यक्ष श्री साळकर, संघाचे अध्यक्ष देविदास सुर्वे, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, भालचंद्र सुतार, प्रभाकर तोंडवळकर, प्रभाकर सुतार, मुख्याध्यापक सी.डी. जाधव, सल्लागार चंद्रकांत पाटकर, पोलीस पाटील पांजरी, तृप्ती हडकर, श्रीधर गोलतकर, दिनेश सुर्वे, सोनाली कदम, किशोर नरे आदी उपस्थित होते. सर्व विध्यार्थ्यांना बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य हडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी भेट दिल्याबद्दल संघाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. तसेच पुढील काळात अशाच सहकार्याची अपेक्षा सल्लागार चंद्रकांत पाटकर यांनी व्यक्त केली.   

ज्येष्ठ नागरिक आमच्या गावची संपत्ती आहे. त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे. यापुढेही सरपंच म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून सदैव ज्येष्ठांच्या पाठीशी राहू असे यावेळी सरपंच प्रकाश तोंडवळकर म्हणाले.  माजी सभापती उदय परब म्हणाले,दरवर्षी त्याच ऊर्जेने हा कार्यक्रम जेष्ठ नागरिक राबवतात. पंचक्रोशी मध्ये मोठे काम जेष्ठ नागरिक संघ करत आहे. तुमची एकजूट अशीच कायम ठेवा. मोठा वारसा हडी गावाला लाभला आहे. यशाची कमान अशीच कायम ठेवा असे सांगितले. जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष देविदास सुर्वे यांनी गावातील विध्यार्थ्यांच्या मागे हा संघ यपुढेही पाठीशी राहील असे सांगितले. संघांचे सल्लागार चंद्रकांत पाटकर यांच्या मोठ्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.           

यावेळी सी. डी. जाधव, दिनेश सुर्वे, श्री साळकर, किशोर नरे यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी उपाध्यक्ष आरती कदम, सदस्य प्रभाकर चिंदरकर, रमेश कावले, दिनकर सुर्वे, नंदकुमार पाटील, सत्यवान सुर्वे, महादेव सुर्वे, गणू परब,अनंत घाडी, उमेश हडकर, प्रभाकर कांदळगावकर आदींसह हडी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक व आभार चंद्रकांत पाटकर यांनी मानले.