
सावंतवाडी : ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असल्याचे निदर्शनास येत आहे. तुमचे विज बिल भरले नसल्याचे सांगून 'टीम व्हिवर'च्या सहाय्याने मोबाईल हॅक करून माजगाव येथील एका तरूणाला तब्बल १ लाख ५ हजाराचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे.
सदर प्रकार ३ नोव्हेंबरला घडला असून तरुणाने आज सावंतवाडी येथील पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार लक्ष्मण पडकील यांनी दिली आहे.