
सावंतवाडी : श्री देव विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे मंगळवार ११ जून २०२४ रोजी सायं ६ वाजता ह. भ. प. श्री शरद दत्तदासबुवा घाग (नृसिंहवाडी) यांची सुश्राव्य 'कीर्तनसेवा' होणार आहे. कीर्तनकार ह.भ.प.श्री शरद दत्तदासबुवा घाग, नृसिंहवाडी यांना साथसंगत हार्मोनियम निलेश मेस्त्री, तबला किशोर सावंत व पखवाज साथ आनंद मेस्त्री करणार आहेत. श्री देव विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे ही कीर्तन सेवा होणार असून सर्व कीर्तनप्रेमींनी कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा आणि विठ्ठलाचे आशीर्वाद घ्यावेत असं आवाहन श्री देव विठ्ठल मंदिर व्यवस्थापन कमिटी, सावंतवाडीन केलं आहे.