ज्ञानदीपच कार्य प्रेरणादायी: माजी मुख्यमंत्री पार्सेकर

Edited by: विनायक गावस
Published on: November 03, 2023 18:33 PM
views 157  views

सावंतवाडी : ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे गेल्या सतरा वर्षांपासूनचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे. समाजातील गुणात्मक आणि विकासात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा योग्य सन्मान करणे आणि त्यांना प्रेरणा देणे हे आदर्श काम 'ज्ञानदीप' करीत असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो अशा शब्दात गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ज्ञानदीपचे कौतुक केले. आज गोवा येथे ज्ञानदीप शिक्षण मंडळाच्या रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारत त्यांनी कार्यक्रमास येण्याची ग्वाही दिली.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना रविवारी होणाऱ्या ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांनी आज माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेत त्यांना निमंत्रण दिले. यावेळी आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी ज्ञानदीपचे तोंड भरून कौतुक केले.