
वैभववाडी : येथील एडगाव तिठ्यावर 74 हजारांचा गुटखा पकडला. ही कारवाई आज दुपारी 12 वाजता एडगाव तिठ्यावर करण्यात आली.
याप्रकरणी उदयकुमार शिनू देवर (रा.फोंडाघाट) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या नेतृत्वाखाली पो.उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, फकुरुद्दीन आगा, पो. कॉ. सागर मसाळ, समीर तांबे, दिपाली राठोड, संदीप राठोड, हरिश जायभाय या पथकाने केली.