कणकवली वीज ग्राहक संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुनाथ कुलकर्णी

कार्याध्यक्षपदी राजन पारकर, सचिवपदी सुप्रिया पाटील
Edited by: उमेश बुचडे
Published on: September 11, 2023 16:42 PM
views 128  views

कणकवली : कणकवली तालुका वीज ग्राहक संघटनेची स्थापना करण्यात आली असून या संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुनाथ उर्फ दादा कुलकर्णी, कार्याध्यक्षपदी राजन पारकर तर सचिव पदी सुप्रिया पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 

कणकवली शासकीय विश्रामगृहावर वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. नितीन म्हापणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हा समन्वयक अ‍ॅड. नंदन वेंगुर्लेकर, राजेश राजाध्यक्ष, जिल्हा सल्लागार अशोक करंबेळकर, कणकवली तालुका व्यापारी संघ अध्यक्ष दीपक बेलवलकर आदी उपस्थितीत होते. या बैठकीत कणकवली तालुका वीज ग्राहक संघटनेची स्थापना करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत.

यावेळी संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष म्हणून उमेश वाळके, राजेश सापळे, विलास कोरगावकर, संजय सरवनकर, सहसचिव बेनी डिसोझा, सुजित जाधव, खजिनदार मिलिंद खाडये, सह खजिनदार शितल मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे.

या संघटनेचे सदस्य म्हणून परेश आचरेकर, दयानंद उबाळे, शंकर धुरी, दिलीप साठम, विठ्ठल चव्हाण, विशाल हर्णे, महेश नार्वेकर, विवेक ताम्हणकर, साईबाबा काणेकर, ऋषिकेश मोरजकर, रंजन चिके, सूर्यकांत परब, सुलेखा आजगावकर, ज्योतिका हरियाण, उमेश बुचडे, शामल म्हाडगुत, चंद्रशेखर देसाई, भास्कर काणेकर यांची निवड करण्यात आली आहे. सल्लागार म्हणून हनीफ पीरखान, डॉ. सुहास पावसकर, दीपक बेलवलकर, अशोक करंबेळकर, संतोष काकडे, नागेश मोरये यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान लवकरच आपण वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी कणकवली तालुक्यातील समस्यांबाबत आणि ग्राहकांच्या अडचणी बाबत चर्चा करणार असल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष गुरुनाथ उर्फ दादा कुलकर्णी यांनी सांगितले आहे.