
सावंतवाडी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना माजी नगरसेवक गुरुदास मठकर यांनी चांदीची गणेश मूर्ती भेट दिली. यावेळी माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते. राजन तेली यांच्या संपर्क कार्यालयाला मुख्यमंत्री सावंत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ही मूर्ती त्यांना भेट दिली. त्यांच्या या भेटीचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.