
देवगड : श्री क्षेत्र औदुंबरपार दत्त मंदिर मोर्वे येथे सालाबादप्रमाणे गुरुपोर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता श्रींचा अभिषेक, सकाळी ९ वाजता श्रीसत्यनारायण महापूजा आणि महाआरती, दुपारी १२ वाजता महाप्रसाद,रात्रौ ९ वाजता स्थानिक भजने आणि दत्त आरती आदी कार्यक्रम होणार आहेत सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्रीक्षेत्र औदुंबरपार दत्त मंदिरचे श्री सत्यवान ज्ञानदेव कांदळगावकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.