रुपेश राऊळांकडून केसरकरांची नाहक बदनामी !

गुणाजी गावडेंचा पलटवार !
Edited by: विनायक गांवस
Published on: March 27, 2024 06:45 AM
views 121  views

सावंतवाडी : खासदार विनायक राऊत यांनी काहीच विकास केला नाही हे आता सिद्ध झाल्याने रुपेश राऊळ यांना जनतेच्या पुढ्यात जाताना व सांगताना लाज वाटते. त्यामुळेच नाहक  केसरकारांची बदनामी करून आपला स्वार्थ साधून कशी मत पदरात पडता येतील यासाठी ते नाहक केसरकारांची बदनामी करत आहेत असा पलटवार शिवसेना पदाधिकारी तथा वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे यांनी केला. दरम्यान जिल्ह्यात जेवढा निधी केसरकर यांनी आणलाय तेवढ्या 10% तरी निधी विनायक राऊत यांनी आणला का ? असा सवाल देखील श्री. गावडे यांनी यावेळी उपस्थित केला.

याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे नमूद केले की, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केसरकर यांची बदनामी करणे थांबवावे. जनतेच्या पुढ्यात जाताना आता त्यांच्याकडे विकासाचे काहीच मुद्दे नाहीत. त्यामुळे हे केसरकारांची बदनामी करून आपली पोळी कशी भरता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच स्वप्न हे भंग होणार असून येणाऱ्या निवडणूकीत महायुतीचा उमेदवार भरघोस मतांनी निवडून येईल व सावंतवाडीतील जनता ही केसरकर यांच्यात पाठीशी उभी राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर विकासाच्या गोष्टी रुपेश राऊळ यांनी आमच्यासोबत करू नये, विनायक राऊत यांनी आधी किती निधी दिला जिल्ह्यासाठी हे जाहीर करावे आणि त्यानंतर आमच्याशी आमने-सामने येण्याची भाषा करावी असा टोला देखील श्री.गावडे यांनी यावेळी हाणला.