गुलाल आमचाच उधळणार : अर्चना सुशांत पांगम

गावचा नव्हे, 25 वर्षात भाजपनं केला स्वत:चा विकास : पांगम
Edited by: विनायक गांवस
Published on: December 15, 2022 17:11 PM
views 348  views

बांदा : बहुचर्चित बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभं केलं आहे ते बांदा शहर विकास पॅनेलनं. थेट सरपंच पदासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. अर्चना सुशांत पांगम मैदानात उतरल्या आहेत.‌ पाचही प्रभागात त्यांनी प्रचाराचा झंझावात सुरू ठेवला असून बांदावासिय यंदा परिवर्तन करणार, २५ वर्ष सत्तेत असलेल्या भाजपला धक्का देणार, असा विश्वास अर्चना पांगम यांनी व्यक्त केलाय. तर माझासह बांदा शहर विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा सौ. पांगम यांनी केला. 


त्या म्हणाल्या, २५ वर्ष भाजपची सत्ता असताना त्यांनी काय काम केलीत हे जनतेला ठावूक आहेत. २५ वर्षांत रस्ते, पाणी हे मुलभूत प्रश्न त्यांना सोडवता आले नाही. त्यांनी स्वतःचा विकास केला, गावचा विकास केलेला नाही हे यावरून दिसत. पण, आम्हाला गावचा विकास करायचा आहे. आमचा पॅनलचच नाव शहर विकास पॅंनल आहे. आमचे सदस्य सुशिक्षित आहेत. आमचे दोन सदस्य याआधी निवडून आले होते. त्यांनीही चांगलं काम प्रभागात केल असून जनता आमच्या बाजून आहे. आमचा गुलाल तयार आहे, गुलाल उधळायची आम्ही वाट पाहत आहोत असा विश्वास सौ. पांगम यांनी व्यक्त केला.


याप्रसंगी या पॅंनेलचे उमेदवार अमृता महाजन, राजेश विरनोडकर, साईप्रसाद काणेकर यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. बांदावासिय आमच्या बांदा शहर विकास पॅनलच्या पाठीशी राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 


तर उद्धव ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख सुशांत पांगम म्हणाले, बांदा शहर विकास आघाडी पॅनलमधून माझी पत्नी अर्चना पांगम थेट सरपंच पदासाठी लढत देत आहे. एक नंबर प्रभागात उपसरपंच हर्षद कामत यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. दोन नं. प्रभागात तिन्ही उमेदवार सुशिक्षित असून संपूर्ण पाचही प्रभागात आम्हाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपकडून विकासकाम होऊ शकली नाहीत.  २५ वर्षांत गावाचा नाही तर त्यांनी स्वतःचा विकास केलाय. लोकांचा प्रतिसाद बघता आमचा विजय हा निश्चित आहे असं मत त्यांनी व्यक्त केल.


यावेळी ठाकरे गट शिवसेना उपतालुकाप्रमुख सुशांत पांगम, उमेदवार राजेश विरनोडकर, साईप्रसाद काणेकर, रिया येडवे, निखिल मयेकर, अर्णव स्वार, ओंकारा नाडकर्णी, चित्रा भिसे, धीरज भिसे, अजय महाजन, ज्ञानेश्वर एडवे, प्रथमेश गोवेकर, अक्षय नाटेकर, संजू महाजन, गौरव महाजन, भाऊ वाळके, पांडूरंग नाटेकर, राकेश विरनोडकर, राजेश पावसकर, भैय्या गोवेकर, बिपीन येडवे, सुनील नाटेकर, अनुप महाजन आदि उपस्थित होते.