ज्येष्ठ चित्रकार शांताराम सोनावणे यांचं मार्गदर्शन

एबस्ट्रॅकच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 27, 2023 17:51 PM
views 45  views

कुडाळ : कोकणच्या निसर्गाचे विलोभनीय रूप, अमूर्त आकार व रंगाच्या माध्यमातून अमूर्त चित्राची एक वेगळी पर्वणी जेष्ठ चित्रकार शांताराम सोनावणे यांच्या कुंचल्यातुन साकारताना रसिकांना प्रत्यक्ष अनुभवता आली.  कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला कार्यशाळेला विद्यार्थी, पालक, कलारसिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  

        सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चित्रकला क्षेत्रात आवड असणाऱ्या व करियर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मा्गदर्शन व्हावे या करीता या कुडाळ एमआयडीसी येथे मुंबई येथील ज्येष्ठ चित्रकार श्री शांताराम सोनावणे यांच्या प्रत्यक्ष अमूर्त चित्राचे (एबस्ट्रॅक चित्र) प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन श्री गणेश स्वामी आर्ट सेंटर, बजाज राईस मिलच्या नजीक, कुडाळ एमआयडीसी येथे करण्यात आले आहे. 

        चित्रकला क्षेत्रात आवड असणाऱ्या व करियर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्रकला क्षेत्रातील व्यक्तिचित्र, अमूर्त चित्र, निसर्गचित्र, वस्तूचित्र, कंपोजीशन तसेच कला क्षेत्रातील विविध विषयांची माहिती व्हावी, या करीता श्री गणेश स्वामी आर्ट सेंटर कुडाळ एमआयडीसी व के बी के चित्र मंदीर आर्ट ट्रस्टचे संचालक व वास्तू विशारद जयवंत नाईक (चौ) व ज्येष्ठ चित्रकार अनिल कुबल यांच्या वतीने या चित्रकला कार्यशाळेचे आयोजन रविवार दि. २६ नोव्हेंबर रोजी स. १० ते ०१ या वेळेत करण्यात आले होते.

       या कार्य शाळेत जहांगीर आर्ट गॅलरी,मुंबई येथे तब्बल 19 वेळा चित्र प्रदर्शन भरवणारे ज्येष्ठ चित्रकार शांताराम सोनावणे यांनी अमूर्त चित्राचे (अॅबस्ट्रक पेंटींग) प्रात्यक्षिक करून दाखवित उपस्थितांना  मार्गदर्शन केले.

        या कार्यशाळेच्या प्रसंगी प्रसिध्द आर्किटेक्ट व के.बी.के चित्रमंदिर आर्ट ट्रस्टचे संचालक जयवंत नाईक (चौ), मुंबई येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक व  हिप्नोथेरपिस्ट अरविंद परुळेकर, जेष्ठ चित्रकार व क्रियेशन ग्रुपचे संचालक अनिल कुबल, माजी जि. प. अध्यक्ष काका कुडाळकर,  सामाजिक कार्यकर्ते रूपेश पावसकर, माजी नगरसेवक अभय शिरसाट, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, डाॅ. संजय सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, लोकमत सिंधुदुर्ग जिल्हा आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक, चित्रकार जनार्दन खोत, जनार्दन शेट्ये, जेष्ठ पत्रकार काका करंबळेकर, विजय पालकर, रवी गावडे, बंड्या जोशी, गुरू दळवी, प्रसाद राणे, काशीराम गायकवाड, संजय तेंडोलकर, यशवंत कदम, लक्ष्मण कुडाळकर, कलाशिक्षक संदीप साळसकर, जीवन कुडाळकर, प्रविण कुडाळकर, चित्रकार रजनीकांत कदम तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

     यावेळी चित्र साकारताना सोनावणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलांमधील कल्पकता पालकांनी जिवंत ठेवावी, चित्र पाहताना स्वातंत्र्य मिळते, आनंद क्षणापुरता असतो, त्यामुळे आनंद घेण्याची क्रिया माणसात उपजत आहे, कला निरखुन पहा, कलेत आनंद घेता आला पाहीजे.

        यावेळी काका कुडाळकर यांनी सांगितले की, यापुर्वी ची पिढी कला क्षेत्रात एकलव्याचे जीवन जगत होती, मात्र अशा कार्यशाळेच्या आयोजनामुळे आताच्या पिढीला नक्की मार्गदर्शक मिळतील असा विश्वास व्यक्त करीत कला हा जगण्याचा, आनंद, समाधान, प्रेरणा देण्याचा विषय आहे असे सांगितले. 

कुडाळला कला व आर्किटेक्ट महाविद्यालय करणार- अरविंद परूळेकर 

       यावेळी अरविंद परूळेकर यांनी सांगितले की,  या जिल्ह्यात अनेक कलाकार आहेत त्या कलाकारांना मार्गदर्शन मिळावे, व्यासपीठ उपलब्ध व्हावे या करिता असे उपक्रम राबविण्यात येत असुन कुडाळ येथे कला महाविद्यालय व आर्किटेक्ट महाविद्यालय लवकरच आम्ही सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

       जिल्ह्यातील कला क्षेत्राची आवड असणार्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील विविध विषयांचे प्रसिध्द चित्रकारा कडुन मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असुन या नंतर फेब्रुवारी महीन्यात दोन दिवस चित्रकला कार्यशाळा असणार असल्याचे सांगितले. 

       तसेच यावेळी उपस्थित सर्वांनी मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या. तसेच माजी जि. प. सदस्य संजय भोगटे, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, सामाजिक कार्यकर्ते बनी नाडकर्णी, प्रा. आनंद वैद्य, अजित म्हाडेश्वर तसेच इतर विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.   

      या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बंड्या जोशी यांनी केले तर आभार रजनीकांत कदम यांनी मानले.

    ही कार्यशाळा  यशस्वी होण्यासाठी अजित कुडाळकर, भुषण उर्फ बंटी कुडाळकर, संदेश मालवणकर, किरण कुडाळकर, यशवंत कुडाळकर, हर्षल मालवणकर, नितेश कुडाळकर, कपिल कुडाळकर, साहील कुडाळकर, ओंकार कदम, रूपेश कुडाळकर, श्रावण कुडाळकर, निखिल कुडाळकर, सुरज कुडाळकर, राहुल जाधव, आर्य सांगेलकर, दिव्यांक सांगेलकर यांनी विशेष सहकार्य केले.