
सावंतवाडी : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधून येथील बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीच्या वतीने सोमवारी 14 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन समाज मंदिर सावंतवाडी येथे करण्यात केले आहे.
सकाळी दहा वाजता ध्वजारोहण, त्रिसरण, पंचशील, बुद्धा पूजा पाठ समता सैनिक दलामार्फत मानवंदना असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असून सकाळी 11 वाजता अभिवादन सभा व समूहगीत गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समन्वय समिती अध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर ह्या असून प्रमुख व्याख्याते म्हणून ऍड सुधाकर बौद्ध बेळगाव हे उपस्थित राहणार आहेत. ते "भारतीय संविधानाची 75 वर्ष" याविषयी मार्गदर्शन करणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी पाटील या उपस्थित राहणार आहेत. यानंतर दुपारी तीन ते पाच या वेळेत माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एक पात्री नाटक होय मी राजगृहातील रमाई बोलते"" हा रमणी बबीता आकाश( पुणे )या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विद्रोही कवयित्री एक पात्री अभिनय सादर करणार आहेत.
सायंकाळी जय भीम रॅली व त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन भीम गर्जना बौद्ध विकास मंडळ व समाज मंदिर यांच्या संयुक्त विद्यालय आयोजित करण्यात आले आहे या संपूर्ण कार्यक्रमात मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायानी उपस्थित राहावे असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.