कृषीदूतांचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन !

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 19, 2024 14:22 PM
views 190  views

सिंधुदुर्गनगरी  : कुडाळ तालुक्यातील बिबवणे येथे ओरोस कृषी महाविद्यालय येथील कृषीदुत आगमन झाले आहे.ते आता नैसर्गिक शेतीसह शेतीविषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांना करणार आहेत व काही प्रयोगही करणार आहेत.

कृषिदूत बिबवणे येथे दाखल झाल्या नंतर  बिबवणे गावच्या सरपंच सृष्टी सुरज कुडपकर उपसरपंच दिपक महादेव सावंत व गावातील शेतकरी आयी आनंद मार्गी , दत्तप्रसाद शशिकांत खानोलकर,  दिल्या देवदत्त हळदणकर, तृप्ती लक्ष्मण चव्हाण,संदेश सुरेश नाईक, लक्ष्मी लक्ष्मण परबयांनी कृषीदुतांचे स्वागत केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कृषी महाविद्यालय किर्लोस,ओरोस चे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद ओगले, प्रा.गोपाल गायकी, प्रा. महेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यश वामने,अजित धायगुडे, अनिकेत  घाडगे, ज्ञानेश्वर भोसले,ओंकार जुगदर, अथर्व मोरे,दिपक शिंगाडे हे कृषीदुत ग्रामीण कृषी कार्यानुभव या शैक्षणिक अभ्यासक्रमाअंतर्गत बिबवणे येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

कृषी शिक्षणाच्या माध्यमातून हे कृषीदुत येथील शेतकऱ्यांच्या सहयोगाने शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, चारा पिके, पारंपारिक नैसर्गिक शेतीचा अभ्यास करणे, वृक्ष लागवड करणे,कृषी विषयक कार्यशाळा घेणे असे विविध उपक्रम राबवणार आहेत.