चिपळूणमध्ये सायबर क्राईम - डाटा ॲनॅलिसीस विषयी मार्गदर्शन शिबीर

Edited by:
Published on: January 01, 2025 18:46 PM
views 311  views

चिपळूण : ऑनलाईन होणारी फसवणूकीपासून कसे सावध राहावे, आपला बचाव कसा करावा आणि डाटा ॲनॅलिसीस क्षेत्रातील करिअर संधी अशा विषयावर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन शिबीर चिपळूण मधील प्रसिद्ध गोडबोले'ज क्लासेस यांनी आयोजित केले आहे. हे मार्गदर्शन शिबीर विनामूल्य, रविवार ता.५ जानेवारी रोजी, सकाळी ११ वाजता, विरेश्वर कॉलनी,  मध्यवर्ती एस.टी.स्टॅन्ड च्या मागील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात होणार आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट प्रमाणित इंजिनिअर डॉ. अक्षय फाटक हे सायबर क्राईम आणि अवेअरनेस या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.  तर पुण्यातील मिहीर भोपळे हे , डॉक्टर, इंजिनिअर या व्यतिरिक्त डाटा ॲनॅलिसीस ॲण्ड डाटा हॅण्डलिंग या क्षेत्रातील उपलब्ध करीयर संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

तरी विद्यार्थी पालक चिपळूण वासीयांनी या शिबीर चा उपयोग करून घेणेसाठी  वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन गोडबोले'ज क्लासेस चे प्रा. अमेय गोडबोले यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी - 9881699682 या  मोबाईल वर संपर्क करावा.