गोगटे- वाळके महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन शिबिर

Edited by:
Published on: January 22, 2024 14:13 PM
views 222  views

बांदा : येथील गोगटे- वाळके महाविद्यालयात 17 जानेवारी 2024 रोजी करिअर कट्टा विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी 'स्पर्धा परीक्षांची जाणीव व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 'या विषयावर 'द ध्येय करिअर अकॅडमी, सावंतवाडी' यांच्यावतीने मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा संदर्भात जाणीव व जागृती निर्माण करून त्यांना ध्येयापर्यंत पोहोचवणे हेच 'ध्येय करिअर अकॅडमी 'चे मुख्य उद्दिष्ट आहे.

या अकॅडमी मधून अनेक विद्यार्थी सरकारी सेवेत व स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले आहेत यादृष्टीने हे व्याख्यान विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरित करणारे ठरेल अशी खात्री या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. काजरेकर यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना दिली.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ओंकार साळकर (द ध्येय अकॅडमी, सावंतवाडी) हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना' ध्येय अकॅडमी' सक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी तयार करण्याचे बीज जोपासत असल्याने त्यांच्यासाठी ही समाधानाची व तेवढीच कर्तव्याची जाणीव करून देणारी बाब आहे, असे म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत श्री अनिल शिर्के यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. रमाकांत गावडे यांनी केले .आभार दीप्ती मोरजकर या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे आजी व माजी असे 50 विद्यार्थी उपस्थित होते.