
सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी प्रशालेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आज चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल, मुंबई येथील क्रमिक विषयातील चिकित्सक व तज्ञ मार्गदर्शकांकडून एसएससी परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासक्रमातील विषयांमधील विद्यार्थ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी, परीक्षेचे ताणतणाव तसेच बोर्डाची उत्तर पत्रिका लेखनाचे तंत्र आणि मंत्र यांविषयी मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
चिकित्सक समूह, गिरगाव, मुंबई व सचिन गुरुनाथ वालावलकर वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शन शिबिर वर्गाची सुरुवात दीपप्रज्वलन व मार्गदर्शकांचे स्वागत करून करण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस. व्ही. भुरे यांनी प्रास्ताविकपर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना संचिता गावडे, ममता सोनवणे, शारदा वायळ, गणेश नार्वेकर, श्रुती गांगरकर, नारायण गीते, कैलास चव्हाण, सचिन वालावलकर यांचे मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रशालेचे शिक्षक.मयुरी.कदम, दिगंबर सारंग, एस. जी. सामंत, पी. बी. बागुल, प्रशालेचे क्लर्क वैभव केंकरे उपस्थित होते. दिगंबर सारंग यांनी चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल,मुंबई व मार्गदर्शक वर्गाचे संस्थेच्या व प्रशालेच्या वतीने आभार मानले.










