पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 09, 2025 20:12 PM
views 112  views

सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार  दि. 10 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि. 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व राखीव.  सकाळी 9.45 वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने एसएसपीएम कॉलेलकडे प्रयाण.  सकाळी 10 वाजता एसएसपीएम कॉलेज, कणकवली येथे आगमन व हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता कोसुंब ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे आगमन व मोटारीने देवरुखकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता मराठा भवन सभागृह, देवरुख येथे श्री. नारायण राणे, खासदार, माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्यासमवेत कार्यक्रमास उपस्थिती.

 दुपारी 11.55 वाजता मोटारीने कांजीवारा, देवरुखकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता कांजीवारा, देवरुख येथे श्री. नारायण राणे, खासदार, माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्यासमवेत कार्यक्रमास उपस्थिती.  दुपारी वाजता 12.15 वाजता मोटारीने कोसुंब हेलिपॅड, संगमेश्वरकडे प्रयाण.  दुपारी 12.30 वाजता कोसुंब हेलिपॅड, संगमेश्वर येथून हेलिकॉप्टरने सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता एसएसपीएम हेलिपॅड, एसएसपीएम कॉलेज, कणकवली येथे आगमन व मोटारीने ओम गणेश निवासस्थान, कणकवलीकडे प्रयाण.  दुपारी 1.15 वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व राखीव.  दुपारी 2.30 वाजता मोटारीने ओरोसकडे प्रयाण.  दुपारी 3 वाजता शासकीय मुलांचे निरिक्षणगृह व बालगृह ओरोस, सिंधुदुर्गनगरी या शासकीय संस्थेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ:- डॉन बॉस्को हायस्कूल शेजारी, ओरोस ता. कुडाळ )  दुपारी 3.30 वाजता जिल्हा नियोजन कार्यक्रमांचे ऑनलाईन उद्घाटनास उपस्थिती. (स्थळ:- ओरोस ता.कुडाळ) 

सायं. 6 वाजता सन्मा.श्री नारायण राणे खासदार, माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस समारंभास उपस्थिती. (स्थळ:- शरद कृषि भवन, ओरोस जि. सिंधुदुर्ग)