
मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा पायाभरणी शुभारंभ // पालकमंत्री नितेश राणे यांचे भाषण // शिवरायांचा पुतळा कोण उभारतोय, कसा उभा राहणार याची माहिती जनतेला व्हावी अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती // त्यामुळे क्लिप द्वारे याची माहिती राज्यातील जनतेला दिली // आमच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम होतो याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत // महायुती सरकार आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बारकाईने यात लक्ष घातला // पुतळ्याच्या पूर्ण उभारणीकडे सरकारचे बारीक लक्ष आहे // जगाला हेवा वाटेल आणि जगभरातील लोक इथे येऊन शिवरायांसमोर नतमस्तक होतील असा पुतळा उभा करू // जगप्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार शिवरायांचा पुतळा उभारत आहेत // मजबूतीने हा पुतळा येणाऱ्या काळात उभा राहील // आमदार निलेश राणे यांनी अनेक संकल्पना आणि सूचना मांडल्या // पुतळ्याच्या उभारणी निमित्त निधीची तरतूद झालीच आहे // त्या व्यतिरिक्त लागणारा निधी देण्याचा दिला शब्द // परिसराचा सुरक्षितता आणि सुशोभीकरणसाठी लागणारा निधी देऊ // शिवसृष्टी उभी राहिल्यास अनेक शिवप्रेमी येतील // शिवरायांचा इतिहास येणाऱ्या शिवप्रेमीना समजेल // शिवसृष्टीसाठी लागणारी जमीन याबाबत जमीन मालक आणि नगरपरिषदेशी चर्चा सुरु आहे // पुतळ्याची दुर्दैवी घटना घडली त्याची प्रत्येकाला वेदना झाली // पण नंतर झालेलं राजकारण केल हे दुर्दैवी // जे कोणी येऊन फोटो काढून गेले त्यांचे पुतळा उभारणीत एक टक्का योगदान नाही // खासदार नारायण राणे, निलेश राणे इथे आले होते त्यावेळी काही विरोधी पक्षाची माकडं आली होती ते आता कुठे आहेत ?// आता त्यांच्या तोंडून एक शब्द निघत नाही // या भागाला अपवित्र करण्याचं काम विरोधकांनी केली // तटबंदी सुद्धा कोसळली // मात्र निलेश राणे यांनी ती कोसळलेली तटबंदी उभी केली याचा निलेश राणे यांचब्याबद्दल अभिमान // विधानसभेत मालवणच्या दिशेने योग्य उमेदवार् निवडून दिला // नाहीतर दांडा घेऊन दिसणारा आता कुठे दिसत नाही // नितेश राणे यांचा वैभव नाईक यांना टोला // येड्या राहुल गांधींनी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली // त्यांना महाराष्ट्राच्या भूमीत पाय ठेवायला देणार का ?// शिवरायांच्या नावाने यांनी फक्त राजकारण केले // pdw विभागाचा डाग पुसून काढणार // लोकांना अभिमान वाटला पाहिजे असा पुतळा उभा राहिला पाहिजे // आपल्याकडे मस्ती करणारे लोक आहेत त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवावा // कुठेही आणि कसलाही धक्का लागता नाही // यापुढे कुठलीही चुकीची घटना घडू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी // पालकमंत्री नितेश राणे //