पालकमंत्री नितेश राणे 25 सप्टेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 24, 2025 20:47 PM
views 130  views

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंधारे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

    नाम. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे ,गुरुवारी 25 सप्टेंबर  रोजी दुपारी ०१.०० वा. मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ०१.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव. दुपारी ०२.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने गोव्याकडे प्रयाण, दुपारी ०३.०० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी ०३.३० वा. बॅरिस्टर नाथ पै यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्ताने बॅरिस्टर नाथ पै कम्युनिटी सेंटरला भेट ( स्थळ : बॅरिस्टर नाथ पै कम्युनिटी सेंटर, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग ), दुपारी ०४.०० वा. मोटारीने कणकवलीकडे प्रयाण, सायं. ०५.०० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व राखीव.