
सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8.15 वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण. सकाळी 9.05 वाजता भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजास मानवंदना व संचालनास उपस्थिती (स्थळ:- पोलीस परेड ग्राऊंड, सिधुदुर्गनगरी.) सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे "आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहा"च्या उद्घाटनास उपस्थिती (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग.) सकाळी 11 वाजता सावडाव धबधबा, ता. कणकवली सुशोभिकरण करणे या कामाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ:- सावडाव, ता. कणकवली.) दुपारी 12 वाजता वैभववाडी पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनास उपस्थिती (स्थळ:- वैभववाडी.) दुपारी 2 वाजता "आम्ही आत्मनिर्भर" गणेशोत्सवानिमित्त विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सवाच्या उद्घाटनास उपस्थिती (स्थळ:- महालक्ष्मी हॉल, कुडाळ.) दुपारी 3 वाजता मोटारीने मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवाकडे प्रयाण.