
सावंतवाडी : बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर यांचे वडील कै. दिनकर कल्याणकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री. नितेश राणे यांनी कल्याणकर कुटुंबीयांचे बांदा येथील निवासस्थानी भेट देत सांत्वन केले.
यावेळी जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शामकांत काणेकर, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, माजी सभापती शीतल राऊळ, अंकुश जाधव, उपसरपंच आबा धारगळकर, ग्रा. पं. सदस्य रत्नाकर आगलावे, रूपाली शिरसाट, शिल्पा परब, रेश्मा सावंत, श्रिया केसरकर, अवंती पंडीत, दर्पण आळवे, समीर कल्याणकर, अमित कल्याणकर, सिद्धेश पावसकर, मनोज कल्याणकर, दादू कविटकर, बाळा आकेरकर, शैलेश केसरकर, केदार कणबर्गी, सिद्धेश महाजन, नितेश पेडणेकर, दीपक गोवेकर, शामराव सावंत, सुनील राऊळ, सुधीर शिरसाट आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.











