
दोडामार्ग : आमदार तसेच माजी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजुर झालेला झोळंबे आंबेडकर नगर मुख्य रस्ता ते महादेव सावंत यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या रस्ता कामांचे भूमिपूजन शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या उपस्थितीत गावच्या जेष्ठ ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच विशाखा नाईक, ग्रामपंचायत सदस्यां सौ संजना गवस, ग्रामपंचायत सदस्य सुभाष गवस, तंटामुक्ती अध्यक्ष सुखाजी गवस, देवस्थान कमिटी अध्यक्ष शंकरराव हरी गवस, जेष्ठ नागरिक शिवराम गावडे, सतेश भिकाजी गवस आणि नाना गवस, शामसुंदर सावंत, विनायक गवस,श्रीधर गवस श्री प्रभाकर गवस, शैलेश गवस श्री मनोहर धुरी, प्रसाद गवस गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.