
कणकवली : तालुक्यातील नाटळ जिल्हा परिषद मतदार संघातील शिवडाव हत्तीचे पाऊल ते लिंगेश्वर मंदिर, कळसुली जोडणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा रस्ता हा सिमेंट काँक्रीट असून त्याला ७ कोटी ७६ लाख ५१ हजार एवढा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार मानले.
त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना संदेश सावंत यांचे देखील शिवडाव ग्रामस्थ यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, शिवडाव ग्रामपंचायत सदस्य नितीन गावकर, चंदू शिरसाठ व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.