
मंडणगड : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रयत्नाने तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मंजुर केलेल्या दोन रस्त्याचे कामांचे भूमीपूजन करण्यात आले.या योजनेच्या माध्यमातून अडखळ टाकवली पंदेरी या रस्त्याचे निर्मीतीसाठी सात कोटी रुपये तर आतखोल तेरडी कुडूक या रस्त्यासाठी सात कोटी रुपये असा निधी मंजुर कऱण्यात आला आहे.
6 ऑक्टोंबर 2025 रोजी या निमीत्ताने आयोजीत भूमीपूजन सोहळ्याचे कार्यक्रमास खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, अजय बिरवटकर, संदीप राजपुरे, प्रकाश शिगवण, साधना बोत्रे, रमेश दळवी, भाई पोस्टुरे, सतु कदम, रमा बेलोसे, नेहा जाधव, आदीती आमरे, समंद मांडलेकर, शाहजान हारविटकर, नगराध्यक्षा सोनेल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, रेश्मा मर्चंडे, प्रियांका लेंडे, सुभाष सापटे, दीनेश लेंडे, फौरोज उकये, राकेश साळुंखे, लुकमान चिखलकर, हरेष मर्चंडे, गणेश सावर्डेकर, हसरत खोपटकर, भावेष लाखण आदी मान्यवर व पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रामिण भागास विकास प्रक्रियेत आणण्याचे काम : तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम
रस्ते व पायाभुत सुविधांचे निर्मीतीने तालुक्यातील सर्व गावे डांबरी रस्त्याने तालुक्याचे मुख्य ठिकाणास जोडली जावीत अशी ग्रामिण भागातील अनेक गावांची अनेक वर्षांची मागणी होती त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून केंद्रशासनाकडे पाठपुरावा करुन गेल्या दीड वर्षात ग्रामिण भागातील रस्त्यांसाठी 22 कोटी रुपये इतका भरघोस निधी मंजुर करुन आणला असल्याची माहीती तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी यावेळी माध्यमांना दिली गतवर्षी पाट शिरगाव रस्त्यासाठी 3 कोटी, देव्हारे गोठे रस्त्यासाठी 5 कोटी निधी मंजुर करुन आणला असून रस्त्याचे कामे प्रगतीपथावर आहेत यामुळे ही गावे तालुका व त्यांना सोईच्या ठिकाणांना जोडली गेली आहेत. लोकहिताचे व महत्वाचे विषय व समस्यांचा प्राधान्यांने विचार करुन तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पार्टी व खासदार सुनील तटकरे काम करीत आहेत. ग्रामिण भागातील अनेक गावे त्यांना सोईच्या ठिकाणी कमी अंतराने जोडली गेली आहेत. या रस्त्यांमुळे त्यांचे विकासाचे प्रक्रीयेला गती येईल लोकाभिमुख कार्यपध्दती व नागरीकांचे प्रश्न सोडविल्याने खासदार सुनील तटकरे व पार्टीवर येथील जनमानसाचा विश्वास वाढत असल्याचे यावेळी सांगीतले.










