चौकुळ म्हाराठी बेरडकीवाडीतील रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन

संदीप गावडे यांच्या हस्ते भूमिपूजन
Edited by: विनायक गांवस
Published on: June 05, 2025 17:41 PM
views 266  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ म्हालाठी बेरडकीवाडी येथे बहुप्रतीक्षित रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले. यामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून, दळणवळणाची सोय मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे.

यावेळी भाजप युवा नेते संदीप गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यांच्यासोबत चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, बूथ अध्यक्ष संतोष गावडे, बूथ अध्यक्ष सोमा गावडे, चौकुळ विकास सोसायटीचे चेअरमन पी. डी. गावडे, दयानंद गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे आणि अनिकेत आसोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना संदीप गावडे यांनी, "या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार असून, विकासाला गती मिळेल," असे सांगितले. तसेच, या रस्त्याच्या कामामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, यामुळे परिसरातील शेतीमाल वाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्याची सोय अधिक सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे