
सावंतवाडी : इन्सुली रमाईनगर येथे छत्रपती शाहू महाराजांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. भीमगर्जना युवक मंडळ, इन्सुली रमाईनगर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिरात छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी प्रतिमा पूजन करून संपन्न झाली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष धम्मचारी लोकदर्शी यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेताना समाजातील सर्व स्तरातील लोकांना विकासाच्या समान संधी मिळण्यासाठी आरक्षण जाहीर करणारे छत्रपती शाहू महाराज हे देशातील पहिले राजे असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी केलेले अस्पृश्यता निवारण, महिला पुनर्विवाह, बालविवाह बंदी, स्त्रि-केशवपन बंदी, शिक्षणाचा अधिकार यासारख्या आपल्या राज्यात राबविलेल्या कायद्यांचे महत्व पटवून सांगून "डाॅ.आंबेडकर हे केवळ अस्पृश्यांचे नव्हे तर देशाचे पुढारी होतील." या शाहू महाराजांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जाहिर सभेत केलेल्या घोषणेची आठवण करून महाराजांच्या दूरदृष्टीची महानता स्पष्ट केली.
यावेळी मंडळाचे सचिव अरविंद जाधव,संघप्रभा महिला बचत गटाच्या वृषाली जाधव, भांडार प्रमुख सिध्देश जाधव, आनंद जाधव, दिपेश जाधव, सानिका जाधव, स्म्रितिषा जाधव, सृष्टी जाधव, अम्रित जाधव, तेजस जाधव, निसर्ग जाधव, बाबली जाधव ईत्यादी उपस्थित होते. शेवटी सिध्देश जाधव यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.