
देवगड : यश संतोष बिर्जे याने सन 2O24 मध्ये झालेल्या बारावी परीक्षेमध्ये सायन्स विभागांमध्ये 89 टक्के गुण मिळवून उत्तम यश संपादन केले. तसेच 2O24 मध्ये झालेल्या नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 663 गुण मिळवून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा मान यशला मिळाला असुन, देवगड तालुक्यातही प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केलेले आहे. तसेच 2O24 मध्ये झालेल्या सीईटी परीक्षेमध्ये देखील 99.94% गुण मिळवून उत्तम यश संपादन केलेले आहे.
यश यांचे वडील संतोष बिर्जे पंचायत समिती देवगड मध्ये कक्ष अधिकारी तर आई स्वप्नजा बिर्जे या पंचायत समिती देवगड मध्ये वरीष्ठ सहाय्यक असुन या दोघांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असुन, या तिहेरी यशाने यश संतोष बिर्जेवर कौतुकाचा वर्षाव होत असुन शिक्षक तसेच आई व वडील यांचे आर्शिवाद व मार्गदर्शन मिळाल्यामुळेच एवढे यश मिळाले असुन यापुढेही सर्वांच्या आर्शिवादाने मेडिकल साईडला एमबीबीएस डॉक्टर होण्याचे स्वप्न मी नक्कीच पुर्ण करीन अशी आशा यश बिर्जे यांनी व्यक्त केली.