
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था दिल्ली (AIIMS Delhi) येथे काही पदांची भरती केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात प्रकाशिक करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत सिनियर रेसिडेंट/ सिनियर डेमोंस्ट्रेटर पदांच्या ४१६ जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकतात. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ली भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.