भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे 'ग्रंथपाल दिन' उत्साहात

आयोजित स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: विनायक गावस
Published on: August 13, 2023 13:39 PM
views 87  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे  'ग्रंथपाल दिन' आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. रमण बाणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर्.रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून कॉलेजच्या लायब्ररी विभागातर्फे "Say It With Bookmarks" ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये  मिथील जाधव प्रथम, निधी धुरी द्वितीय व साहिल देसाई यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. सृष्टी जाधव, प्रथम बुरान, ऐश्वर्या गावकर  यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. श्रावणी मालवणकर हिला विशेष पारितोषिक देण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. "विद्यार्थ्यांचे सुवर्ण भविष्य ग्रंथालयांमध्ये तयार होत असते व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये ग्रंथालयांचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व" याविषयी प्राचार्य मा. डॉ. बाणे यांनी मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी उपप्राचार्य मा. जी.ए. भोसले सर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल मानसी कुडतरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास ग्रंथालय सल्लागार समितीचे मोलाचे सहकार्य लाभले.