माजगावात ग्रंथ दिंडी

माजगाव पंचक्रोशी ग्रंथालयाचा सुवर्ण महोत्सव
Edited by:
Published on: January 28, 2025 19:56 PM
views 83  views

सावंतवाडी : माजगाव पंचक्रोशी ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाची सुरुवात 26 जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रंथदिंडीने  करण्यात आली‌. ग्रामपंचायत माजगाव येथील ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सरपंच डॉ.अर्चना सावंत यांच्या शुभ हस्ते दिंडीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत ग्रंथालयाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत गुरुजी सर्व सदस्य व वाचक ग्रामपंचायत सर्व सदस्य कर्मचारी भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय शिक्षक मुले ,जिल्हा परिषद शाळा सर्व शिक्षक शिक्षिका मुले ,आरोग्य अधिकारी आशा,अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ यांनी ग्रंथदिंडी सहभाग घेतला होता. ग्रंथ दिंडीची सुरुवात माजगाव ग्रामपंचायत इथून सुरू झाली. ती सातेरी मंदिर खोतवाडा  म्हालटकरवाडा येथील देवघर नाईक वाडा हरसावंतवाडा भटवाडी या मुख्य रस्त्याने ग्रंथालयाकडे आली ढोलांच्या गजरात व मुलांच्या घोषणाने गावातील वातावरण आनंदी व चैतन्यमय झाले. गावातील सर्व स्तरातील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, कर्मचारी वर्गाने उपस्थित राहून ग्रंथ दिंडीची शोभा वाढविली.