
मंडणगड : भारतीय सैन्य दलात निवड होऊन सैनिकी प्रशिक्षण पुर्ण केलेल्या मंडणगड शहरातील गांधीचौक बौध्दवाडी येथील वैभव मर्चंडे या अग्नीवीर जवानाचे प्रशिक्षण पुर्ण करुन आल्याबद्दल शहरातील नागरीकांचेवतीने भव्य स्वागत करण्यात आले. रविवार 8 डीसेंबर 2024 रोजी वैभव मर्चंडे यांची शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली यावेळी त्याचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास अँड. राकेश साळुंखे, मनोज मर्चंडे, राजेश मर्चंडे, विजय खैरे, नरेंद्र सकपाळ, सतिष खैरे, विजय पोटफोडे, दशरथ सापटे, सुशिल जाधव, सुदर्शन सकपाळ, सुर्यकांत जाधव, प्रतिक गमरे, विनीत रेगे, बाळकृष्ण मर्चंडे, वसंत मर्चंडे, शरद धोत्रे, महेश मर्चंडे, कमलेश मर्चंडे, प्रमोद मर्चंडे, प्रशांत मर्चंडे, सिध्दार्थ मर्चंडे, दिनकर मर्चंडे, नितेश मर्चंडे, आदी मान्यवर हजर होते. प्रशिक्षण पुर्ण झालेल्या वैभव याची नियुक्ती जम्मु काश्मिर येथे झाली आहे.