कणकवलीत राज मोबाईलचे ग्रँड रिओपनिंग !

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 24, 2023 15:40 PM
views 1080  views

कणकवली : कणकवली मधील मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांची पसंती नेहमी राज मोबाईल्स आणि इलेक्ट्रिक शॉपला असते. त्यामुळे आज या राज मोबाईल शॉपीचे रिओपनिंग कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते दिमाखात पार पडले.  कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या राज  मोबाईल ग्रँड रिओपनिंग कणकवली तहसीलदार आर जे पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तसेच विवो कंपनीच्या मोबाईलचे देखील फित कापून अनावरण करण्यात आले.

कणकवलीत इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा मोबाईल घ्यायचा असेल तर पहिलं नाव राज मोबाईलचा इथं कारण ऑनलाइन रिचार्ज ज्यावेळी मिळत नव्हतं त्यावेळी राज मोबाईलचे मालक संतोष अंधारी यांनीच ते ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. तसेच त्यांची सेवा आणि सुविधा देखील खूप चांगली असल्याचे राज मोबाईल शॉपीच्या ग्रँड रिओपनिंग प्रसंगी तहसीलदार  आर जे पवार यांनी सांगितले. यावेळी संतोष अंधारी साधना अंधारी, संदेश राणे, समीर ठक्कर, देव बाणे, मुकेश हतीसकर हे देखील उपस्थित होते.

नामांकित कंपन्या असलेल्या म्हणजेच आयफोन, सॅमसंग, विवो, नोकिया, रेडमी, रियल मी यांचे मोबाईल विक्रीसाठी व पाहण्यासाठी राज मोबाईलने उपलब्ध करून दिले आहेत, तसेच स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वॉच, मोबाईल अक्सेसरीज हे देखील ग्राहकांना राज मोबाईलच्यावतीने उपलब्ध करून दिले असून कमीत कमी डाऊन पेमेंट व फायनान्स वर देखील हे मोबाईलव ॲक्सेसरीज ग्राहकांना आपण उपलब्ध करत असल्याचे संदेश राणे यांनी सांगितले. 

तसेच संतोष अंधारे यांनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये आपण बरेच वर्ष काम केलेले आहे आणि आता 14 वर्षे आपण मोबाईल क्षेत्रामध्ये  काम करत आहोत. त्यामुळे ग्राहकांना नवनवीन बाजारामध्ये आलेले मोबाईल ग्राहकापर्यंत पोहोचवणे व चांगल्यात चांगली सेवा देणे हेच आमचे काम असल्याचे अंधारी यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी करत या उद्घाटन समारंभाची शोभा वाढवली.