
सावंतवाडी : मातृभूमि शिक्षण संस्था संचलित ‘सन्मान शाहळा’ यांच्या वतीने ‘शिवसंस्कार’ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध ऐतिहासिक स्पर्धांचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा आज शनिवारी, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ३.३० वाजता बॅ. नाथ पे सभागृह, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास पालकमंत्री, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात सुधीर थारात (श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, शिवशंभू विचार मंच, पुणे), रणजित हिर्लेकर (कोकण इतिहास परिषद, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष) आणि श्री. प्रथमेश खामकर (युवा इतिहास अभ्यासक, पुणे) यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
विजय सोनवणे (अध्यापक, जनता विद्यालय, तळवडे) आणि अनुजा साळगांवकरे (मुख्याध्यापिका, मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
सोहळ्यानंतर रात्री ठीक ८ वाजता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंग ‘अफजलखान वध’ यावर आधारित ‘नरसिंह शिवराय’ हे शिवगणेश प्रोडक्शन, मुंबई निर्मित, गणेश ठाकूर लिखित, दिग्दर्शित व अभिनित ऐतिहासिक नाटक सादर केले जाणार आहे. कार्यक्रम नियोजित वेळेतच सुरू होणार आहे.










