दोडामार्ग मध्ये ग्रीन व्हिलेज रिसॉर्टचे शानदार उद्घाटन

दोडामार्ग तालुक्यात पर्यटन वाढीसाठी ग्रीन व्हिलेज ठरेलं मैलाचा दगड : युवराज लखमराजे भोसले
Edited by: संदीप देसाई
Published on: October 13, 2024 09:59 AM
views 476  views

दोडामार्ग : दोडामार्ग येथील प्रतिथयश उद्योजक, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक यांच्या दोडामार्ग शहरातील "ग्रीन व्हिलेज रिसॉर्ट"चे शानदार उदघाट्न दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शनिवारी करण्यात आले. सावंतवाडी संस्थानचे युवराज व हॉटेलिंग इंडस्ट्री क्षेत्रात मोठं योगदान आसलेल्या युवराज लखमराजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते झाले. 

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कसई दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिपक मानें, ट्रिबो कंपनीचे अधिकारी फ्रँसिको काब्राल यांसह काका मांजरेकर, कोकणसादचे संपादक संदीप देसाई, स्वतः ग्रीन व्हिलेज रिसॉर्टचे मालक विवेकानंद नाईक, त्यांच्या पत्नी सौ. वर्षा नाईक, नगरसेवक राजेश प्रसादी, पत्रकार सुहास देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लखमराजे यांनी शुभेच्छा देताना सांगितलं की, हे रिसॉर्ट खऱ्या अर्थाने दोडामार्ग तालुक्यातील पर्यटनाला नवीन चालना देणारे ठरणार आहे. देश विदेशातील पर्यटकांना या रिसॉर्ट मध्ये थ्री स्टार दर्जाचा इको टुरिझमचा अनुभव घेता येणार आहे. शिवाय दोडामार्ग शहराच्या विकासाला उद्योग व्यवसायांना चालना मिळणार आहे. ग्रामीण भागात इतकी मोठी गुंतवणूक करून श्री.नाईक यांनी खरोरोखरच धाडसी व समाजहिताचे पाऊल उचलल आहे. भविष्यात त्यांना जे जे सहकार्य लागेल यासाठी आपण पाठीशी राहू अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.  तर नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी विवेकानंद नाईक हे दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व आहे. ते नेहमीच सामाजिक हित तसेच तालुक्यातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांनी मनात आणले तर ते काम तडीस लावल्या शिवाय थांबत नाहीत.


तर विवेकानंद नाईक म्हणाले की, गोवा येथे येणारे देशी विदेशी पर्यटक हे दोडामार्ग तालुक्यात आले पाहिजे, येथील पर्यटन स्थळे बघितली पाहिजे, यासाठी ग्रीन व्हिलेज रिसॉर्टची उभारणी केलीय. यासाठी त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अधिकारी यांचेही मार्गदर्शन लाभल्याचे बोलताना ग्रीन व्हिलेज रिसॉर्टचे मालक विवेकानंद नाईक यांनी सांगितले. दोडामार्ग तालुक्यातील युवाई ही गोव्यात तुटपुंज्या पगाराच्या नोकऱ्या करतात. मात्र पर्यटन हा व्यवसाय येत्या काळात रोजगाराचे प्रमुख साधन बनणार असून. आपल्या हॉटेल बरोबरच येत्या काळात अनेक ताज बरोबरच अनेक मोठं मोठी हॉटेल्स पर्यटन जिल्ह्यात उभारली जाणार आहेत. त्यांना लागणारे व्हेजीटेबल, मशरूम शेती, कोकणी मेवा याला या इंडस्ट्रीज मध्ये प्रचंड वाव आहे. त्यामुळे आजपासून भूमिपुत्र आसलेल्या युवा वर्गाने याकडे लक्ष देऊन इको टुरिझम ला प्राधान्य दिले पाहिजे. असाही कानमंत्र विवेकानंद नाईक यांनी दिला आहे. यावेळी नगरसेवक राजेश प्रसादि, सुभाष दळवी, हळबे कॉलेज प्राचाय सुभाष सावंत यांसह अनेक मान्यवरानी विवेकानंद नाईक यांच्या मित्र परिवार आदींनी या सोहळ्यात सहभागी होत सदिच्छा दिल्या.

दोडामार्ग मागे नाही...

आपण ठरवलं तर दोडामार्ग तालुक्यात काही होऊ शकत, हेच या आगळ्या वेगळ्या पर्यटन प्रकल्पातुन आपण  अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय. जेणेकरून आपल्या तालुक्यातील युवा वर्ग भविष्यातील मोठ्या संधी आसलेल्या पर्यटन व्यवसायाकडे वळेल. निसर्ग आणि थ्री स्टार दर्जाचे पर्यटन उभारण सोपी बाब नाही पण आपल्या भागासाठी समाजासाठी आपण काही तरी शाश्वत केलं पाहिजे यासाठी आपण विशेष मेहनत घेतल्याच ते म्हणाले. 

रिसॉर्ट, व्हीला व रेस्टोरंटचे मान्यवरांनी केल उदघाट्न...

ग्रीन व्हिलेज रिसॉर्टचे युवराज लखमराजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर या रिसॉर्ट मधील खास आकर्षण आसलेल्या दोन्ही व्हीलाचं नगराध्यक्ष चेतन चव्हाण व एमटीडीसी चे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांच्या हस्ते करण्यात आले.