
सावंतवाडी : सिंधुदुर्गात प्रथमच सावंतवाडीतील युवक यश सावंत यांच्या पुढाकारातून पेपर बॅग फॅक्टरी सुरु झाली आहे. सुप्रसिद्ध तबलावादक किशोर सावंत यांच्या हस्ते या 'इको प्राईम' फॅक्टरीचा शानदार शुभारंभ करण्यात आला.
'इको प्राईम'या पेपर बॅग, ग्रॉसरी बॅग, शॉपिंग बॅग, प्रिंटेड पेपर बॅग या नविन कारखान्यात उपलब्ध आहेत. उद्यमनगर, माजगांव येथे या फॅक्टरीचा शुभारंभ झाला आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच पेपर बॅग फॅक्टरी असून प्लास्टिक बंदी नंतर त्याला पर्याय म्हणून विघटनशील अशा पेपर बॅगचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. प्लास्टिकला पर्याय असावा अशी संकल्पना होती त्यातून याची निर्मिती झाली आहे. मराठी माणूस म्हणून उद्योग क्षेत्रात पाऊल टाकल आहे. तुमच्या व्यवसायाच्या ब्रॅण्डसह प्रिंटेड पेपर बॅग आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे व्यावसायिक व जनतेन प्लास्टिकचा वापर न करता पर्यावरण पुरक अशा पेपर बॅगला प्राधान्य द्यावं असं आवाहन युवा उद्योजक यश सावंत यांनी केले. वडील म्हणून यशचा अभिमान आहे. सर्वांशी चर्चा करून त्यानं उद्योग क्षेत्रात पाऊल टाकल असून यात त्याला शुभेच्छा आहेत अशी भावना सुप्रसिद्ध तबलावादक किशोर सावंत यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी यश सावंत, किशोर सावंत, दीपा सावंत, राजु सावंत, सरिता सावंत, दुर्वा सावंत, सिद्धेश सावंत, संकेत सावंत, भाऊ साळगावकर, प्रेरणा पोकळे, सीमा मठकर, प्रमोद खाडकर, शेखर तेंडुलकर, मिहीर मठकर, शिवाजी जाधव, साईकिरण परब, रामदास पारकर, सागर चुडजी, कौस्तुभ चुडजी, देवेन चुडजी, वैभव केंकरे, स्मिता केंकरे आदी उपस्थित होते.