'कॉटनकिंग' & 'टायझर'च्या नव्या दालनाचं सावंतवडीत 'ग्रॅण्ड ओपनिंग'

▪️टायझरचे डायरेक्टर कुणाल मराठे यांची विशेष उपस्थिती
Edited by: विनायक गावस
Published on: July 04, 2023 20:03 PM
views 178  views

सावंतवाडी : शहरातील अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या 'कॉटनकिंग' & 'टायझर' कंपनीचे नवे प्रशस्त दालन मोती तलाव समोर, रामेश्वर प्लाझाच्या नव्या जागेत सुरु झालं आहे. सावंतवाडीकरांच्या उदंड प्रतिसादानंतर 'कॉटनकिंग' व 'टायझर' या दोन्ही नव्या शोअरूमच उद्घाटन आज सायंकाळी ५.३० वाजता टायझरचे डायरेक्टर कुणाल मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं.

सावंतवडीकरांनी 'टायझर'ला  दिलेला रिस्पॉन्स पाहता आम्ही प्रशस्त दालन सुरु केलं आहे. नवी व्हरायटी नवा स्टॉक उपलब्ध आहे. शुभारंभानिमित्त टायझर ब्रॅण्डच्या कपड्यांवर २५ टक्के डिस्काउंट देण्यात आला आहे त्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असं आवाहन टायझरचे डायरेक्टर कुणाल मराठे यांनी केल आहे. 

या ग्रँड ओपनिंग निमित्त रेडीमेड ब्रँडेड कपड्यांवर खास ऑफर ठेवण्यात आली आहे. कॉटनकिंग ब्रॅण्डच्या कपड्यांवर तब्बल २० टक्के डिस्काउंट तर टायझर ब्रॅण्डच्या कपड्यांवर २५ टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहेत. ही ऑफर फक्त ९ जुलैपर्यंत उपलब्ध राहणार आहे. 

तरी शॉप नं. ४७ / ४८ /४९/५० रामेश्वर प्लाजा, मोती तलावाजवळ, सावंतवाडी या ठिकाणी असलेल्या नव्या शोरूमला भेट देत ग्रँड ओपनिंग निमित्त असलेल्या ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक स्वप्नील कदम यांनी केलं आहे. 

याप्रसंगी यशवंत कदम, स्वाती कदम, संचालक स्वप्नील कदम, सानिका कदम, शशिकांत कदम, निशिकांत कदम, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, जितेंद्र मोरजक, दयानंद रेडकर, योगेश (बंडया )आरोलकर, सुरेंद्र कासकर आदी उपस्थित होते.