
कुडाळ : रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री. रुपेश पावसकर यांच्यावतीने नेरुर पंचक्रोशी मर्यादित 'कलेचा देव कलेश्वर भव्य नरकासुर स्पर्धा २०२५' आणि 'भव्य बैल सजावट स्पर्धा २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही स्पर्धांमुळे नेरुरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भव्य नरकासुर स्पर्धा
दिनांक व वेळ: पहिली नरकासुर स्पर्धा रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न होणार आहे.
पुरस्कार: या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम पारितोषिक रोख ₹ १२,०००/- व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख ₹ ७,०००/- व आकर्षक चषक आणि तृतीय पारितोषिक रोख ₹ ४,०००/- व आकर्षक चषक दिले जाईल. तसेच, उत्तेजनार्थ इतर सर्व सहभागी मंडळांना रोख ₹ १,०००/- देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम व निकष:
* स्पर्धेच्या नियमावलीनुसार नरकासुर स्पर्धेच्या ठिकाणी वेळेत आणणे बंधनकारक आहे, अन्यथा १० गुण कमी होतील.
* सादरीकरणात नरकासुराचा वध करणे आवश्यक आहे.
* कथा पौराणिक कथेचा आधार घेऊन गरजेनुसार थोडाफार बदल करण्यास हरकत नाही.
* सादरीकरणाची वेळ प्रत्येक संघासाठी जास्तीत जास्त १० मिनिटे असेल.
* ही स्पर्धा नेरूर पंचक्रोशी मर्यादित आहे.
* परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
*गुणपत्रक (एकूण १०० गुण): नरकासुर प्रतिमा (२०), वेशभूषा/रंगसंगती (१०), चल चित्र (१०), नाविन्यपूर्ण/वैशिष्ट्यपूर्ण (१०), सादरीकरण/नरकासुर वध (३०), नरकासुर स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर आणणे (१०), आणि विषय/प्रश्नोत्तर (१०) अशाप्रकारे गुणांचे वितरण केले आहे.
भव्य बैल सजावट स्पर्धा:
* दिनांक व वेळ: बैल सजावट स्पर्धा बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे.
* सहभागी बैल मालक: प्रकाश साऊळ, आजीम मुजावर, भाई नारिंग्रेकर, श्री. विशाल नाईक, बाळा रेवंडकर, आनंद लिंगे, अवि शिरसाट, स्वप्निल नेरुरकर, बाळा नांदोसकर, बाबी साऊळ, आदी बैल मालक यात सहभागी होणार आहेत.
* रॅली: कलेश्वर मंदिर, नेरूर ते नेरूर चव्हाटा अशी या सजवलेल्या बैलांची रॅली स्पर्धा संपन्न होणार आहे.
रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री. रुपेश पावसकर यांनी नेरूर पंचक्रोशीतील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत करण्याचे आवाहन केले आहे.